आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:पाथरवालात आपत्ती व्यवस्थापनाची तालीम; स्थानिक मच्छीमारांना सहभाग घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

वडीगोद्री21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड व अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या उपस्थितीत पाण्यामध्ये व्यक्ती पडल्यानंतर त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठीची रंगीत तालीम करण्यात आली.

यावेळी स्थानिकचे मच्छिमारांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या. त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिले. पाणी धोक्याची पातळी ओलांडून जात असताना किंवा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यास गोदावरी काठच्या सर्व गावकऱ्यांनी दक्षता घेऊन नदीमध्ये जनावरे वगैरे बांधू नयेत. तसेच नदीच्या काठावरील स्वतः जनावरे इतरत्र स्थलांतरित करावी व पशुधनाची व जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

तसेच पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे व त्यांचा जीव वाचवणे यासाठीचे प्रयोग यशस्वीरीत्या करण्यात आला. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, नायब तहसीलदार गौरव खैरनार, तलाठी स्वप्नील खरात, सरपंच, उपसरपंच, मंडळाधिकारी रुईकर ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...