आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे निवेदन:महावितरण अधिकाऱ्यांशी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा

जालना2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या विहिरींना भरमसाट पाणीसाठा आहे. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहे. रात्री बेरात्री धोका पत्करुन शेतकऱ्यांना नाइलाजाने शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. महावितरणने आपला कारभार सुधारावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी मागील आठवड्यात जालना तालुक्यातील नेर ते वंजार उम्रद अशी पायी दिंडी काढून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व त्यांचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेतल्या. यामध्ये विज मंडळाच्या अनेक अडचणी जनतेतून समोर आल्या. त्या अनुषंगाने २४ नोव्हेंबर रोजी अंबेकर यांनी शिष्टमंडळासह महावितरणचे अधिक्षक अभियंता पठाण यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विजेच्या गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुन ते मार्गी लावण्याची मागणी केली.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी शेजुळ, तालुकाप्रमुख हरिभाऊ पोहेकर, माजी सभापती मुरलीधर थेटे, बबन खरात, बाबुराव कायंदे, सखाराम गिराम, रमेश वाघ, देवनाथ जाधव आदींची उपस्थिती होती. अंबेकर म्हणाले, जळालेले रोहित्र महिना-महिना दुरुस्त होवूनही मिळत नाही.

दुरुस्त झालेले रोहित्र पुन्हा लवकरच नादुरुस्त होते. क्षमतेपेक्षा अधिक भार असलेले रोहित्र खराब होतात. त्यामुळे त्याची क्षमता वाढविण्यात यावी व डीपीसाठी लागणारे आईलची उपलब्धता पुरेशा प्रमाणात करण्यात यावी. तसेच वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा शेतकऱ्यांसाठी नुकसान करणारा आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडीत करु नये. तसेच वारंवार ट्रिप होणार्‍या फिल्डरची क्षमता वाढविण्यात यावी. अनेक गावांत लोंबकळणार्‍या विजेच्या तारा नवीन पोल लावून ओढून घ्याव्यात. जेणे करुन शॉटशर्किट होवून गहू, ऊस आदी पिकांचे नुकसान नाही. अनेक गावांना नवीन रोहित्रांची गरज आहे. ते तत्काळ देण्यात यावे. शक्य तो दिवसाच विज पुरवठा करण्यात यावा. अनेक गावांत शेतीसाठी व गावांसाठीचा विज पुरवठा स्वतंत्रपणे ट्रान्सफॉर्मरवरुन करण्यात यावा. अनेक वर्षे जुन्या असलेल्या सबस्टेशनवर जिर्णे झालेली वायरिंग बदलण्यात यावी, अशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...