आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:अंबड काँग्रेस कमिटी बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा

अंबड2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठकीत आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, सुदामराव मते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे, प्रभाकर पवार, अण्णासाहेब खंदारे, तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा, केदार कुलकर्णी, सुरेश मुळे, वैजिनाथ डोंगरे, सोपान सपकाळ आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेण्यात येऊन तालुकाध्यक्ष निवडीचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवून तालूकाध्यक्ष योग्य तो निवडला जाईल, असे मते यांनी सांगितले. तर आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले. या वेळी नारायण मुंडे, मुश्ताक शाह, शेख शकील, खुर्शिद जिलानी, अरेफभाई, बाबासाहेब घोलप, जाकेर डावरगावकर, संतोष दिंडे, रवी डोंगरे, असद पठाण, शिंदे, बाबा सोळुंके, नवाज पटेल, काशिनाथ शेवाळे, शुभम शेवाळे, सिकंदर पठाण, लक्ष्मण पवार, राघू ताठे, प्रल्हाद उगले, गणी सय्यद, राजू वाघुडे, अकबर शेख, दत्ता गाजरे, प्रल्हाद जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...