आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:माता-पालक बैठकीत विविध विषयांवर चर्चा

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते तिसरीच्या माता आणि पालकांची बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रारंभी सरपंच लीलावती काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सूर्यकला काळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. बैठकीत शिक्षक, माता पालक यांच्यात संवाद चर्चा करण्यात आली.

माता पालक आणि शिक्षक यांनी अनुभव कथन केले आणि मातांना यशस्वी व्यक्तींची यशोगाथा सांगण्यात आली यावेळी शैक्षणिक प्रगती विषयी चर्चा करण्यात येऊन दरमहा बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक चक्रधर बागल यांनी केले. महिलांना जेष्ठ प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वरी गिराम, पदवीधर शिक्षक अनंत कुमार शीलवंत, जनाबाई भुंबे, दीपा उंचेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पार्वती पवार, चापलवाड, कमलबाई काळे, आशा सरसंडे, राखी नरोडे, कविता काळे, चंदा काळे, सुनीता कांबळे, सुशीला नरवडे, शोभा काळे, ऐश्वर्या काळे, पूजा कमाने, संगीता आठवले, गंगा काळे, नम्रता काळे, स्वाती कुटे, राधा वराडे, निर्मला कमाने, अनिता मंडलिक आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...