आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:महा अंनिसच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महा अंनिसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवण्यात आली. यात शाखा विस्तार करणे, नवीन सभासद जोडणे, आणि अंनिस अनुषंगाने कृतिशील कार्यक्रम आयोजित करणे आदी विषयावर चर्चा झाली.

बैठकीत अतुल बडवे यांची राज्याच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल तसेच राजू खिल्लारे यांची दुसरे परिवर्तनवादी साहित्य संमेलनात जालना प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षा वैशाली सरदार, माया सुतार, किशोर आघाम, बुवाबाजी संघर्ष समितीचे कार्यवाह तथा सर्पमित्र रंगनाथ खरात, कठोरे, सिद्धोधन राऊत आदीची उपस्थिती होती.