आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष ‎:टेनिस व्हॉलीबॉल विकासासाठी पवारांशी चर्चा‎

सेलू‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलिबॉल‎ फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश‎ वांगवाड व महाराष्ट्र राज्य सचिव‎ गणेश माळवे यांनी नवी दिल्ली येथे‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद‎ पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब‎ दानवे यांची भेट घेऊन टेनिस‎ व्हॉलिबॉल खेळाच्या विकासासाठी‎ मदत करण्याचे आवाहन केले.‎ टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ‎ इंडियाच्यावतीने नवी दिल्ली येथील‎ जनपथ परिसरातील खासदार शरद‎ पवार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब‎ दानवे यांची भेट घेऊन त्यांना टेनिस‎ व्हॉलिबॉल खेळाची माहिती देऊन‎ या खेळाच्या प्रसारासाठी मदत‎ करण्याचे साकडे घातले.

यावेळी‎ दिल्ली सचिव हरेंद्र कुमार, हरियाणा‎ सचिव परवेज राणा, सुरेंद्र शास्त्री,‎ निकिता डागर आदींची देखील भेट‎ घेऊन त्यांना टेनिस व्हॉलिबॉल‎ खेळाची सविस्तर माहिती दिली.‎ डॉ. व्यंकटेश वांगवाड व गणेश‎ माळवे यांनी महाराष्ट्राच्या मातीतील‎ खेळ जगाच्या पाठीवर घेऊन‎ जाण्यासाठी, खेळाच्या‎ विकासासाठी चर्चा केली. तसेच‎ टेनिस व्हॉलिबॉल खेळास‎ ऑलिम्पिकसाठी व आंतरराष्ट्रीय‎ टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजना‎ संदर्भात शरद पवार व रावसाहेब‎ दानवे यांच्याशी चर्चा केली. दोन्ही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नेत्यांनी याबाबत सकारात्मकता‎ दाखवली.

भारतीय ऑलिम्पिक‎ महासंघाला प्रस्ताव सादर करण्यात‎ आला आहे. तसेच केंद्रीय क्रीडा‎ मंत्रालयात अंतिम मान्यतेसाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.‎ केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत‎ कराड यांच्या निवासस्थानी भेट‎ देऊन टेनिस व्हॉलिबॉल खेळाची‎ माहिती पुस्तिका देण्यात आली. या‎ भेटीस खासदार संजय जाधव,‎ खासदार वंदना चव्हाण, खासदार‎ वंदना चव्हाण, भास्कर दानवे,‎ विजय कान्हेकर, गजानन वाळके,‎ चंद्रकांत बोराडे यांचे सहकार्य‎ लाभले. टेनिस व्हॉलिबॉल‎ खेळाच्या आजपर्यंत २४ राष्ट्रीय‎ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात‎ आल्या आहेत. तसेच १६ जुलै‎ जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिनाचे‎ औचित्य साधून साऊथ आशियाई‎ क्रीडा स्पर्धा आयोजन बाबत‎ आंतरराष्ट्रीय फेडरेशन अध्यक्ष डॉ.‎ व्यंकटेश वांगवाड यांनी माहिती‎ दिली. यावेळी सेलू शहरातील‎ पदाधिकारी, ,खेळाडू उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...