आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदई एक्को:प्रवेशद्वार कमानीला नाव देण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; पोलिसांचा गोळीबार, एक जखमी

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवेशद्वार कमानीला नाव देण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. यानंतर दगडफेक झाल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्लास्टिक बुलेट लागून एक जण जखमी झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. विश्वंभर तळेकर असे जखमीचे नाव आहे. काही शासकीय वाहनांच्या काचाही फुटल्या आहेत.

भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को गावच्या प्रवेशद्वारावर वेशीचे नाव देण्याच्या कारणावरून महिनाभरापासून गावात वाद सुरू होता. दरम्यान, वेशीच्या बाजूलाच महापुरुषाचा एक पुतळा असल्यामुळे वाद वाढला होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी हा वाद वाढल्यानंतर पोलिस गावात आले. या ठिकाणी महापुरुषाचा पुतळा व वेस बाजूला काढण्यावरून गावातील दोन गट वाद घालत होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात जमाव जमला. दगडफेक सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. गावात पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण गावालाच वेढा दिला असून दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे.

गावात पोलिसांचा बंदोबस्त
^गावात एक एसआरपीएफची एक तुकडी तैनात केली आहे. तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
- हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, जालना.

बातम्या आणखी आहेत...