आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणावर इयत्ता ५ ली १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जानेवारी रोजी आनंदनगरी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी ४१ विविध पदार्थ विक्रीसाठी स्टाॅल लावले. विद्यार्थ्यांना बाल आनंदनगरीतुन व्यावहारीक ज्ञान मिळावे व त्यांचा व्यावहारीक दृष्टिकोन विकसित व्हावा व भविष्यात त्यांनी निडरपणे आपल्या मनातील न्युनगंड बाजुला सारुन मोठा उद्योग व्यावसाय सुरु करावा व त्यांना आनंद नगरीतुन विक्री कौशल्य यावे यासाठी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रभारी मुख्याध्यापक उमेश दुनगहू यांनी सांगितले.
या आनंद नगरीतील स्टाॅलमध्ये विविध प्रकारचे स्वादिष्ट, रुचकर, चवदार पदार्थ, पाणीपुरी, वडापाव, तीळगुळ, बोरे, जांब, विविध प्रकारची चाॅकलेट, पोंगे, बिस्किटे, गुळ, शेगदाणापट्टी, पिस्ता, पिज्जा, मठ्ठा, मसाला पान, रगडा, पापडा, वटाना, हरबरा, मटकीच्या घुगऱ्या, आईसक्रीम,अननस, भाजीपाला, गरमागरम पोहे, मिसळपाव आदी प्रकाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. यात इयत्ता ९ वी वर्गातील निखिल भालके व अभिनव दुनगहु यांनी आनंद नगरीत गरमागरम बजे जिलेबी तळून दिल्याने सर्वांचे लक्ष या दुकानाकडे वेधले गेले. या बाजारात त्यांनी जास्त रक्कम जमवली.
तर चिकु ढवळे याने लावलेल्या स्टॉलवरील स्वादिष्ट भेळचा अनेकांनी आस्वाद घेतला. यावेळी शिक्षक, पालक व इतर विद्यार्थ्यांनी या सर्व स्टॉल भेट देऊन या उपक्रमात सहभाग घेतला. दिवसभर चाललेल्या या आनंदनगरीत १५ हजार रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक उमेश दुनगहू, शिवहरी ढाकने, दिलीप आढावे, शालेय समितीचे अध्यक्ष जाफर पठाण, माजी सरपंच भारत हिवाळे, प्रल्हाद चव्हाण, धनंजय ढवळे, संजय छडीदार, मनोज साळवे, शिवाजी देशमुख, बळीराम उबरहंडे, अर्जुन धारे, विजय वानेरे, श्रीकांत पवार, शालिकराम जाधव, मधुकर उखर्डे, उषा चव्हाण, रंजना सांगळे, सुखदा पाटील, सुनिता नागरे, ज्ञानेश्वर शिंगणे, ओम देशमुख आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.