आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल तसेच त्यांच्याबरेाबर शिक्षकांची असलेली भूमिका याबाबत अविरत हे प्रशिक्षण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत विद्यार्थी असलेल्या जिप शाळांतील ६७८ शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत प्रशिक्षणाचे तीन टप्पे झाले असून यातीलच शिक्षकांना हे प्रशिक्षण घेता येणार आहे.
दरम्यान, सुरूवातीला तालुक्यातील दोन असे १६ तज्ञांचे प्रशिक्षण होणार त्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण होईल. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी खास महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अविरत ऑनलाइन प्रशिक्षण सन २०१७ पासून सुरू करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने त्यांच्यासोबत चर्चा करणे सोयीस्कर व्हावे या अनुषंगाने अविरत प्रशिक्षण सुरू केले होते. सन २०१७ पासून अविरत प्रशिक्षणाचे एक, दोन आणि तीन असे टप्पे झाले होते.
यात संबंधित शाळेतील मुख्याध्यापक व दोन माध्यमिक शिक्षक यांना प्रशिक्षण दिले होते. या अगोदर अविरत एक दोन आणि तीन असे टप्पे झाले त्यामध्ये शिकण्याच्या आंतरक्रियेमध्ये अधिक चांगले परिणाम दिसून आले होते. याचाच एक पुढचा भाग म्हणून ज्या शिक्षकांनी अविरत टप्पा एक, दोन व तीन पूर्ण केले आहे यांच्यासाठीच अविरत प्रशिक्षण टप्पा चारचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता व विभागप्रमुख विनोद राख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील जिल्हा समुपदेशक डॉ. गोदावरी उगले, कैलास तिडके, समुपदेशक यांच्या नियोजनानुसार सदरील प्रशिक्षण जिल्हाभरात आयोजित केले जाणार आहे. तालुकास्तरावर समन्वयक म्हणून कैलास गायकवाड (जालना), कल्पना पाटिल (बदनापूर), सतीश देशमुख (अंबड), प्रल्हाद सोलाटे (घनसावंगी), योगेश औटी (परतुर), अभिमान बायस (मंठा) चंद्रशेखर देशमुख (भोकरदन), नारायण पिंपळे (जाफराबाद) हे काम पाहतील तर तालुकास्तरीय अविरत तज्ञ मार्गदर्शक म्हणून सचिन देशमुख, सरस्वती माध्यमिक विद्यालय गोंदेगाव, कैलास जाधव किसनराव गोरंटयाल माध्यमिक विद्यालय, पाचनवडगाव, गजानन डोईफोडे साईबाबा माध्यमिक विद्यालय, अकोला निकळक, संजीव कुमार खंदारे कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बदनापूर, जगन दुर्गे धर्मवीर संभाजी हायस्कूल, डोमेगाव ता. अंबड, महेश गोडबोले प्रबोधाकार ठाकरे हायस्कूल शहागड, श्रावण पवार प्रशाला राणीउंचेगाव ता. घनसावंगी, एम. एस. सोनवणे, स. भू. प्रशाला रांजणी कैलास गाडगे जिल्हा परिषद प्रशाला परतूर, सुरेश पातोडकर समर्थ विद्यालय पाटोदा, रमेश शेरे स्वामी विवेकाद हायस्कूल मंठा, कृष्णा भांडवलकर जिल्हा परिषद प्रशाला पांगरी गोसावी, रविंद्र वाघ सरस्वती विद्या मंदिर सेलूद, संजय शेळके जिल्हा परिषद प्रशाला नळणी, समाधान दुनगहू कै. मारोतराव देशमुख विद्यालय टेंभुर्णी, संतोष शेळके शिवाजी विद्यालय, बोरगाव फाट हे काम पाहणार आहेत.
सीईओ मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे अविरत चौथ्या टप्प्याचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली २ फेब्रुवारी ते ३ मार्च यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. तरी याचा लाभ माध्यमिक शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे व शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगल धुपे यांनी संयुक्तपणे केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.