आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिका:जि. प. उर्दू शाळेच्या पाच वर्गांसाठी एकच शिक्षिका

धावडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा येथे समतानगर जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पाचवीपर्यंत आहे. येथे पाच शिक्षकांची मान्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षिका दोन वर्षांपासून कार्यरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार केलेली आहे. परंतु काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येत्या दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी जिल्हा परिषदेसमोर शाळा भरवण्यात येऊन सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. समता नगरच्या प्राथमिक उर्दू शाळेत १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाच शिक्षकांची पदे मंजूर आहेत.

मागील दोन वर्षांपासून केवळ एकच महिला शिक्षिका कार्यरत आहे. परिणामी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर त्वरीत कार्यवाही करुन रिक्त असलेली चार पदे न भरल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरदार पठाण, अकबर खान, गयास पठाण, शेख वसीम, उमर पठाण, सय्द इर्शाद, इलियास पठाण, शेख शाहेद, निजाम खान, शेख वाहेद, जावेद पठाण, सलमान पठाण, जुबेर पठाण, शेख जावेद, जुनेद खान आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...