आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय‎ साहित्यांचे वाटप:जि. प. शाळांचे विद्यार्थी सर्व क्षेत्रांत‎ यशस्वी ठरलेले आहेत ‎; माजी राज्यमंत्री अर्जुन‎ खोतकर यांचा सल्ला

जालना‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या‎ शाळा ह्या गुणवंत विद्यार्थी घडवित‎ असून सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज‎ जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तयार‎ झाले असल्याने विद्यार्थ्यांनी शालेय‎ जीवनात स्वतःचा चौफेर विकास‎ करावा. असा सल्ला शिवसेना‎ उपनेते माजी राज्यमंत्री अर्जुन‎ खोतकर यांनी दिला.‎ जालना तालुक्यातील सिरसवाडी‎ येथील जिल्हा परिषद प्राथमिक‎ शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय‎ साहित्य वितरित करण्यात आले.‎

यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला‎ युवा सेनेचे रवींद्र ढगे, सरपंच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुमित्रा ढगे, शालेय समिती अध्यक्ष‎ मच्छिंद्र खळेकर, माजी सरपंच‎ कालिंदा ढगे, उपाध्यक्ष गजानन ढगे‎ ,मुख्याध्यापक एन. डी. सुतार यांची‎ उपस्थिती होती. . यावेळी एस‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ .पी.कुलकर्णी, एस. व्ही.आठवले,‎ एल. सी.सावरकर, के. पी.‎ क्षीरसागर, ए. एच. निंभोरे, ए. एस.‎ रहाटे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी,‎ पालकांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...