आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक उपक्रम:सात वर्षांत वाटप केली 24 हजार 500 रोपे, ग्रामस्थांकडून कौतुक; 7 वर्षांपासून मोफत रोपे वाटपाचा उपक्रम

दानापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील दानापुर येथील रहिवासी रमेश सांडू कनगरे ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कामगार असून वृक्षप्रेमी असल्याने मागील सात वर्षांपासून दरवर्षी ग्रामस्थांना विविध प्रकारची रोपे मोफत वाटप करतात. आतापर्यंत त्यांनी ३५०० रोपांची लागवड करून मोफत वाटप केली आहेत. यापुढे हे कार्य असेच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

प्रारंभी २०१५ मध्ये गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जवळ वेगवेगळ्या जातीच्या रोपांची लागवड केली होती. परंतु नवीन असल्यामुळे रोपे वाटताना तारांबळ झाली होती. २०१६ पासून घरामागील परिसरात ५ ते ६ हजार रोपे बसतील या प्रमाणे जागा तयार करून जुई धरणातून दरवर्षी एक ट्रॅक्टर गाळ आणून पॉलिथीनमध्ये रोपे तैयार करतात. या कामी त्यांना पत्नी विमल कनगरे मदत करतात. तयार केलेल्या रोपाला पाणी भरण्यासाठी स्वखर्चाने नळ कनेक्शन घेतले आहे.

गावरान आंबा कमी झाल्याने यंदा गावरान आंब्याची १२०० कलम तयार केली आहेत. तसेच जांभुळ ६००, चिंच ३००, बदाम ३००, कासीद ३०, सिसम ५०० व लिंब ३०० असे एकूण ३५०० रोप तयार केली आहेत. पाऊस पडल्यानंतर दानापुरसह पंचक्रोशीत जो व्यक्ती आपल्या मुलांप्रमाणे झाडांची देखरेख करेल अशाच व्यक्तीला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. जोपर्यंत आपण जीवंत आहोत तोपर्यंत कलमा तयार करुन रोपे वाटप करण्याचा उपक्रम सुरु ठेवणार असून यातून मला आत्मिक समाधान मिळत असल्याचे कनगरे म्हणाले. शासन दरवर्षी वृक्ष लागवड आणि रोपे तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहेत. तर दुसरीकडे असे वृक्षप्रेमी खर्च करीत रोपे मोफत वाटप करीत आहेत. मागील सात वर्षात त्यांनी २४ हजार ५०० रोपटे वाटप केली.

बातम्या आणखी आहेत...