आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतुर तालुक्यातील आष्टी येथील लालबहादुर शास्त्री विद्यालयात ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या मुलींसाठी मानव विकास अंतर्गत शुक्रवारी प्राचार्य एल. के. बिरादार यांच्या हस्ते ३८ मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक के. बी. जगताप, पर्यवेक्षक वसंत धोंडगे, अशोक काटे, एस. एस. वाव्हळ, एस. एस. गवळी, ए. बी. अवचार, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, गट समन्वयक कल्याण बागल, केंद्र प्रमुख राम सोळंके, मानव विकास तालुका समन्वयक हनुमंत काटमोडे यांची उपस्थिती होती.
काटमोडे म्हणाले, ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मानव विकास अंतर्गत तीन टप्प्यात सदरील योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी मधील गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमासाठी बाबा बरकुले, बळी खवल, अमृत चौरे आदींनी परिश्रम घेतले. या विद्यालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून शाळेत येणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असुन अनेक मुलींना ज्या ठिकाणी बस जात नाही. अशा वाड्या वस्तीवरील मुलींना पायपीट करीत यावे लागत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.