आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लँकेटचे वाटप:दिव्यांग दिनानिमित्त काजळा येथे ग्रामपंचायततर्फे ब्लँकेटचे वाटप

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बदनापूर तालुक्यातील काजळा येथे ग्रामपंचायत तर्फे गावातील नोंदणीकृत सर्व दिव्यांगाना तसेच मागासवर्गीय महिला व कोरोनाग्रस्त विधवांना थंडी पासुन बचाव होण्यासाठी ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.

यावेळी सर्व दिव्यांगाचा ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रंगनाथ देवकाते, प्रकाश गावडे, वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन व बदनापूर पंचायत समितीचे माजी सभापती रघुनाथ भोर्डे, पोलिस पाटील लक्ष्मण पैठणे, प्रल्हाद महाराज खोटे, आसाराम गरड, सुभाष करडे, कैलास खंडेकर, ज्ञानेश्वर बोबडे, ग्रामविकास अधिकारी पी. बी. राठोड, मुख्याध्यापक आर. आर. जोशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...