आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:आमदार लोणीकरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप; राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतील परतूर तालुक्यातील लाभार्थींना केली मदत

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील परतूर तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण परतूर येथील तहसील कार्यालयात माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी करण्यात आले. या वेळी बोलतांना आमदार लोणीकर म्हणाले, आपणास मिळणारी ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याचे आपणास जाणीव असून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही मदत आपणास दिली जात आहे. आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैवी घटना घडल्या आहेत मात्र आपण प्रत्येक बाबतीत आपल्या पाठीशी खंबीर असून आपणास आज अक्षय तृतीया व ईद पूर्वी ही मदत मिळत असल्याने आपण समाधानी असल्याचे आमदार लोणीकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, पद्माकर कवडे, नायब तहसीलदार धुमाळ, भगवानराव मोरे, रमेशराव भापकर, दया काटे, ओमप्रकाश मोर, तुकाराम सोळंके , शत्रुघ्न कणसे, कृष्णा आरगडे, सिद्धेश्वर सोळंके, रवी सोळंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थी नंदाबाई रंगनाथ भदर्गे, रेणुका प्रकाश गाडे, अलका सुखदेव शेळके, निलाबाई परसराम जाधव कृशीवर्ता बाबुराव बागल, कलावती भिमराव आडे, ताराबाई सुरेश तांगडे, संदीप रुस्तुम लोखंडे, दादाराव तुळशीराम टोणपे, जयनाबी नादान सय्यद, संगीता तात्याराव लाटे, आशामती दत्ता कवडे, मालन विठ्ठलराव कवडे, शालिनी छगन काटकर, कुशवार्ता मनोहर गायकवाड, रामकोर कुंडलिक तौर, कालींदा दत्ता काटे, मालन बापूराव निर्वळ, तारामती सुभाष अंभोरे, चंद्रकला प्रकाश हिवाळे, मीरा मदन दांगट, रेवताबाई देविदास सोळंके, रेहान बी सज्जन शेख, हौसाबाई भागाराव साळवे, आशामती रामराव तांबडे, नंदा काशिनाथ पहाडे, मीरा जनार्दन उबाळे, शेख गोसिया बी इफ्तेखार, इसा उस्मान सय्यद, आसाराम भीमराव गलबे यांना प्रत्येकी वीस हजार रुपयाचे धनादेश माजी मंत्री लोणीकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...