आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सदैव तयार रहावे:अग्रशक्ती बहू मंडळाकडून शालेय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जनता हायस्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना अग्रशक्ती बहू मंडळाकडून मोफत पाणी बॉटल, शैक्षणिक साहित्य व बिस्किट पुड्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी अग्रशक्ती बहु मंडळाच्या अध्यक्षा प्रीती मल्लावत, सचिव ममता गुप्ता, आयुषी बगडिया, प्रिया गिंदोडीया, मेघा गिंदोडिया, पूजा तवरावाला, मुख्याध्यापक इंद्रजीत जाधव यांची उपस्थिती होती. बहु मंडळाच्या अध्यक्षा प्रीती मल्लावत यांनी स्वातंत्र्य दिनाच्या विद्यार्थी व उपस्थितांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा व आपले भविष्य उज्वल बनवावे, मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सदैव तयार रहावे. असे सांगितले. पूजा तवरावाला यांनी विविधतेमध्ये एकता जोपासणारा जगाच्या पाठीवर भारत एकमेव देश आहे आपण सर्वांनी एकजुटीने देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. प्रास्ताविक पवन जोशी यांनी तर अनिता पवार यांनी आभार मानले. सदरील कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक विभागातील जवळपास २५० विद्यार्थ्यांना पाणी बॉटल, शैक्षणिक साहित्य व बिस्किट पुड्याचे वाटप करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने कोमल निजलेवार यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा पत्राचे वाटप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना सोनवणे, संतोष गंडाळ, प्रभाकर सावंत, बाबासाहेब पवार, विष्णू पवार, राजू डोंगरे, रोहिदास राठोड, देवानंद वाघ, निकिता अलकोंडा, सुधीर वाघमारे, संदीप तोडावत आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...