आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:गोसेवा आश्रमातील गायींसाठी महिनाभराच्या चाऱ्याचे केले वाटप

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार संतोष दानवे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून जाफराबाद टंेभुर्णी रोड वरील गोंधनखेडा जवळील गौरी शंकर गोसेवा आश्रमातील गायींना घाटगे परिवार व भाजपच्या वतीने अकराशे उसाच्या वाढ्यांच्या भेळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या गायींना किमान एक महीना पुरेल एवढया चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी श्री गौरी शंकर महादेव आश्रमाचे मठाधिपती प.पु.महेशगीरी बाबा चरणी प्रार्थना केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, मेडीकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष एकनाथ घाटगे, नगरसेवक अनिल बोर्डे, गाढे, प्रल्हाद चव्हाण, संजय अंभोरे, चव्हाण महाराज, डॉ. जोशी, डॉ. खंडागळे, अनिल वरगणे, भगवान अंभोरे, फकीरबा वरगणे, शिवाजी वरगणे, सत्यजित दिवटे, नागेश धुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...