आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम:आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1500 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग वाटप

परतूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सातोना येथील मूळ रहिवासी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अध्यात्मिक मार्गदर्शक ओम रामेश्वर महाराज यांनी आपल्या मूळगावी सातोना येथील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या जवळपास १ हजार ५०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे मोफत वाटप केले आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध होत नाहीत. शैक्षणिक साहित्याची कमतरता त्यांच्या शिक्षणातील अडथळा बनू नये, म्हणून महाराजांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना स्कूलबॅग उपलब्ध करून दिल्या आहेत. स्कूल बॅग आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी जवळपास ५ लाख रुपये खर्च आला आहे. आपल्या आई स्व.मुक्ताबाई जानकीराम पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम आपल्या सातोना खुर्द या मूळ गावी राबविला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सोमवारी स्कुल बॅगचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. सातोना येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित कार्यक्रमाला रामेश्वर महाराज यांच्या समवेत विलासराव आकात, बाबासाहेब आकात, रोहन आकात, सरपंच विकास खरात, संदीप करवा, श्रीवल्लभ राठी, जफर पठाण, रौफभाई पठाण, परमेश्वर आकात, मुख्याध्यापक मरपवाड यांच्यासह शालेय समितीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या गावातील एकही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या काही गरजू विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक दत्तक घेणार असून, त्यांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याची माहिती रामेश्वर महाराज यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...