आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुळे विधवा झालेल्या 12 महिलांना शेळ्यांचे वाटप; संरक्षण अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांची दिली जाणार माहिती

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील १२ एकल महिलांना सोमवारी शेळ्यांचे वाटप करण्यात आले असून एकल महिलांसाठी संस्थांकडून विविध शासकीय योजनांची महिती देत त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, पुणे येथील संध्या गोखले यांच्या प्रेरणेतून महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम व आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाटुरच्या वतीने ही मदत देण्यात आली. विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात तहसीलदार रूपा चित्रक व नायब तहसीलदार राजेंद्र धुमाळ यांच्या हस्ते शेळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी संतोष पवार, वैजीनाथ राऊत, विठ्ठल सातपुते, अजय कांबळे, सोमेश्वर सोनटक्के, भास्कर साळवे, हेमंत पहाडे, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ राऊत, अनिता राऊत, सविता राऊत, गणेश खरात, राजेश राऊत, सुरेश बच्छिरे आदींची उपस्थिती होती. तहसीलदार चित्रक म्हणाल्या, शिक्षणामुळे विधवा प्रथा कमी झाली असून आता ती पूर्णपणे नष्ट करायची वेळ आली आहे. आज समाजात विधवा महिलांना अपमानास्पद, दुय्यम वागणूक दिली जाते. तसेच तिच्याकडे वाईट नजरेने बघितले जाते.

एवढेच नव्हे तर वडिलांना अग्नी देता येत नाही. मुलाला किंवा मुलीला विधवा असल्याने हळद लावता येत नाही. यामुळे विधवांचा आत्मसन्मान दुखावला जातो. यासाठी सर्वांनी मिळून विधवा प्रथा व अनिष्ट रुढी बंद केल्या पाहिजे. यासाठी सामजिक संस्थाकडून मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करावी, प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भास्कर साळवे तर आभार सोमेश्वर सोनटक्के यांनी मानले.

विधवांच्या सन्मानासाठी ग्रामसभेत ठराव मांडणार
जिल्ह्यातील ३० ग्रामसभेत ठराव मंजूर करून तो शासनाला पाठविण्यात येणार असून स्थानिक आमदारांच्या मदतीने पावसाळी अधिवेशन आवाज उठवून न्याय देण्याचे प्रयत्न केल जातील, असे आधार बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...