आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कारांचे वितरण:कलारत्न व क्रीडारत्न गौरव पुरस्कारांचे वितरण

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला क्रीडादूत फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरावर दिला जाणारा पहिला महाराष्ट्र कलारत्न व महाराष्ट्र क्रीडारत्न गौरव पुरस्कारांचे वितरण ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या हस्ते देवगिरी इंग्लिश स्कूल, जालना येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होलसेल व रिटेल केमिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तोतला, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, देवगिरी विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन सोरटी, युवा नेते अक्षय पवार, केमिस्ट असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी आनंद वरियानी, मुख्याध्यापिका प्रा. गायत्री सोरटी, क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर, शेख मोहंमद, संतोष वाबळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख चाँद पी.जे. यांनी केले. सूत्रसंचालन सुनीता खिल्लारे यांनी यांनी केले, तर रोहिणी गिरी यांनी आभार मानले. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र कला रत्न मेघा प्राणजित बोरसे, कुशल जगदीश वर्तक, महाराष्ट्र क्रीडारत्न धनश्री मनीष सावे, सुभाष हिरामण निकुंभ, सुनील प्रभाकर वाघ, उमेशचंद्र खंदारकर, सोनल कांतीलाल रंगारी, डॉ. धनंजय जयसिंगराव पाटील, डॉ. माधुरी महादेवराव वानकर, विनायक मधुकर मराले यांचा समावेश आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख अहेमद कादर, विशाल साळवे, सुरेश त्रीभुवन, मंगेश सोरटी, किरण पाटील, नितीन जाधव, संतोष वाघ, वेदांत सोरटी, शेख समीर, सोहेल खान, पवन दांडगे, शैलेश मोरे, शेख साबेर, अक्षय गंगावणे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...