आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचे वाटप:वखारी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना केेले साहित्याचे वाटप

सिंधी काळेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील वखारी ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग दिनानिमित्त १८ लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा म्हणून दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. त्यामुळे प्रहार पक्षाचे नेते तथा आमदार बच्चु कडु यांनी यासाठी मेहनत व परिश्रम घेतले. त्यामुळे आमदार बच्चु कडु यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सरपंच काका पाटील घुले, ग्रामसेवक वझरकर, भाजप अपंग सेल तालुकाध्यक्ष लक्ष्मण राठोड, बाळु वाटोळे, छगन खैरे, भुजंगराव घुले, नामदेव घुले, रघुनाथ घुले, संजय पवार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...