आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किटचे वाटप:बोरखेडीत होणार क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत बोरखेडी (माळाचा गणपतीजवळ, सिंदखेडराजा रोड, जालना) येथे सोमवारी क्षय रुग्णांसाठी कोरडा पोषण आहार किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एकाच वेळी सर्व उपचाराखालील क्षय रुग्णांना पोषण आहार किट वाटप करणारा जालना हा देशातील पहिला जिल्हा ठरणार असल्याचा दावा जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट हा उपक्रम संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात १३९१ क्षयरुग्ण उपचार घेत असून त्यांना पोषण आहार देण्याकरीता बोरखेडी येथे कार्यक्रम होणार आहे. उद्योजक भावेशभाई पटेल आणि रमेशभाई पटेल यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, उद्योजक घनश्याम गोयल, सुनिल रायठठ्ठा यांची उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...