आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील गजानन उच्च आणि माध्यमिक महाविद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवी, नववीच्या १९ विद्यार्थिनींना सायकल, इयत्ता पाचवी ते आठवीच्या गरजू १२५ विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग व नोटबुक वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थी गोपाळ सोनवणे, सचिन वनार्से, जागृती दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुगनचंद परदेशी तर प्रमुख पाहुणे सरपंच सुरेश लाठी, उपसरपंच बाबासाहेब जोशी, कृष्णा खडेकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष ईश्वर पठाडे, देवलाल आकोदे, बाळकृष्ण रासने, वसीम शेख, निसार कुरेशी, अजीज शेख, राजेश गरुड, तौफिक कादरी, निलेश राठोड, गणेश सोनवणे, लतीफ शेख, जम्मू शेख, सोमीनाथ खडेकर, पाशु शेख, मनोहर शेजुळ, पंडीत शेजुळ, भाऊसाहेब खडेकर उपस्थित होते. प्रास्ताविक ज्योती ताटेकर यांनी केले. सूत्रसंचालन विष्णु इंगळे यांनी तर आनंद इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शकुनी सरकटे, शंकर गोरे, संदिप जोशी, संजय गुजर, विष्णु गावंडे, प्रा.आबासाहेब इंगळे, प्रा.दिनेश भागवत, प्रा.रामेश्वर वनार्से, विठ्ठल घोडके, सुवर्णा सोनवणे, विकास किनगे, भागवत चेके, तुकाराम मेंडके, सोपान भुरके, विष्णु नेवरे, सुरेश वाघ,अशोक पाचपुते, मधुकर इंगळे, भानुदास देवरे यांच्यासह आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.