आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण:जिल्हा परिषद शाळेत जवखेडा केंद्राअंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण

हसनाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील जवखेडा केंद्रांतर्गत येणाऱ्या १४ जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले असून त्याचाच भाग म्हणून हसनाबाद येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी पाठ्यपुस्तक पोच करण्यात आली.

त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हसनाबाद येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना १० जून रोजी पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येणार असल्याचे केंद्रप्रमुख डी. डी. जिवरग यांनी सांगितले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे त्या नुसार जवखेडा केंद्रातील जवळपास सर्वच शाळांमध्ये पुस्तके पोच झाली आहेत. यावेळी शिक्षक काळे, लक्ष्मण राऊत, पठाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...