आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील निकळक येथे कृषि विज्ञान केंद्र,बदनापूरच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. साधना उमरीकर यांनी पोषण बाग अभियान अंर्तगत महिलांना भाजीपाला १२ प्रकारचे बियाणे संचाचे वाटप करून आपल्या आहारात ताज्या व पोषक भाजीपाला असणे किती महत्वाचे आहे बाबत मार्गदर्शन केले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉ. अश्विनी बोडखे यांनी मृदा तपासणीचे महत्व सांगून माती परिक्षणा करीता शेतातून मृदा संकलन कसे करावे या संबंधी मार्गदर्शन केले.
शास्त्रज्ञ डॉ. एफ. आर. तडवी यांनी आद्य रेषिय चाचणी अंतर्गत असलेले शेतकऱ्यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटी दिली. तसेच सद्या पावेतो पशुपालकांना भेडसावणाऱ्या लम्पी आजाराबाबत जागरूक राहून आपल्या जनावरांना संसर्गजन्य आजार होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले. शिवाय दुधाळ जनावरांची विशेष काळजीपूर्वक निगा राखवी असे आवाहन केले. यावेळी मदर डेअरी संकलन केंद्र, निकळक चेअरमन बाबासाहेब सावंत, ग्रामपंचायत सदस्य सावंत, सय्यद आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.