आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:महिलादिनी बालविवाह निर्मूलनाची‎ शपथ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन‎

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात बालविवाहाची अनिष्ट प्रथा‎ रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरून विविध उपाययोजना‎ केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून‎ (बुधवार, ८ मार्च) जागतिक महिलादिनी सकाळी ११‎ वाजता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा,‎ महाविद्यालये, ग्रामपंचायती, शासकीय व निमशासकीय‎ आस्थापना आदी सर्वांनी बालविवाह निर्मूलनाची शपथ‎ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड‎ यांनी केले आहे.‎

हुंड्याचा हाच पैसा मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगात‎ आणल्यास मुलगी स्वावलंबी होईल. मुलींवर‎ अत्याचारही होणार नाहीत. बालविवाह होऊ नये‎ यासाठी समाजाने मानसिकता बदलणे गरजेचे आहे,‎ असे आवाहन त्यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर‎ जिल्हा ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाने बालविवाह‎ निर्मूलनाची शपथ घेण्याचे ठरवले आहे.‎‎

बातम्या आणखी आहेत...