आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:कुंडलिकेत जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान; जालनेकरांचाही मिळतोय उत्स्फूर्त सहभाग, नदीपात्राचा कायापालट

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली कुंडलिका नदीपात्र देहेडकरवाडी जवळ सामूहिक श्रमदान मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेत जालनेकरांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

कुंडलिका - सीना रिज्युवनेशन व डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने कुंडलिका व सीना नदी पात्रांचे खोलीकरण रुंदीकरण करण्यात येत आहे. यावेळी फाऊंडेशनच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व जालनेकरांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार या महिन्यातील दुसरा शनिवार १४ मे रोजी पुढील श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तरी सर्व नागरिकांनी या श्रमदान मोहिमेत देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या मोहिमेत जालन्यातील नागरिक तसेच तरूणांनी उत्साहात सहभाग नोंदवत आहे.

बातम्या आणखी आहेत...