आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:जिल्हास्तरीय लोकशाही‎ दिनाचे सोमवारी आयोजन‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या‎ पहिल्या सोमवारी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.‎ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ६ मार्च रोजी‎ सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे‎ आयोजन केले आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज‎ देताना त्यांनी संबंधित तालुक्यांतील तिसऱ्या सोमवारी‎ तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला‎ असावा व सदर तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक‎ महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही‎ कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन‎ क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यत दोन प्रतीमध्ये‎ अर्ज सादर करावा.‎ तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात‎ भाग घेतला नाही अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले‎ जाणार नाहीत, लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी‎ अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठवणे‎ आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालय‎ जालना यांच्या कार्यालयाकडुन सुचीत केले आहे.‎

कोणत्याही स्तरावर लोकशाही दिनात खालील‎ बाबींशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.‎ न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक‎ आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व‎ त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न‎ जोडलेले अर्ज. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील‎ टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची‎ पोचपावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदती व नमुन्यात‎ ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागद पत्रासह अर्ज केले‎ असतील त्यांना तक्रार मांडता येईल. असे कळवण्यात‎ आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...