आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:जिल्हा ग्रंथालय असोसिएशनच्या वतीने विविध ग्रंथालयांचा पुरस्काराने सन्मान

टेंभूर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हा ग्रंथालय असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनात ग्रंथालय संघातर्फे वरूड येथील स्वा.विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास शंकरराव बालेकर स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार. मठपिंपळगाव येथील क्रांतीसिंह नाना पाटील वाचनालयाचे देविदास जिगे यांना भगवानराव देशपांडे स्र्मुती उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार. नेर येथील वटेश्वर वाचनालयाचे ग्रंथपाल रत्नाकर नंद यांना अण्णासाहेब चव्हाण स्र्मुती उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार देण्यात आला.

यावेळी ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हाध्यक्ष राजशेखर बालेकर, देविदास देशपांडे, राजेश पाटील, आकाश देशमुख, सरपंच गौतम म्हस्के, संतोष पाचे, सतीश दिंडे, डॉ.अमोल वाघ, शंकर पवार, रामधन कळंबे, प्राचार्य भास्कर चेके, पी. जी. तांबेकर, कैलास बियाणी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...