आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जिल्हा युवा मंडळ पुरस्कार;  अर्ज पाठवण्याचे आवाहन

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण युवक मंडळांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेळ मंत्रालयांतर्गत नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून जिल्हा युवा मंडळ पुरस्कार योजना सुरु केली आहे. नेहरू युवा केंद्र जालनाशी संलग्नीत युवा वर्गाकरिता काम करणारे व संस्था नोंदणी कायदा अंतर्गत पंजीकृत युवा मंडळे पुरस्काराकरिता अर्ज करु शकतात. इच्छुकांनी जिल्हा युवा मंडळ पुरस्काराकरिता २४ डिसेंबपर्यंत जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जालना यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.

आरोग्य, कुंटुब कल्याण, पर्यावरण संरक्षण, साक्षरता, महिला सक्षमीकरण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार निर्मिती, सामाजिक समस्या व स्थानिक प्रश्नांचे निराकरण, ग्राम स्वच्छता आदी क्षेत्रातील योगदानाच्या आधारे जिल्हा निवड समिती जिल्हास्तरावरील जिल्हा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्काराकरिता १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील केलेले कार्य ग्राह्य धरुन युवा मंडळाची निवड करण्यात येतील. मागील दोन वर्षांत ज्यांना हा पुरस्कार मिळाला ते या पुरस्काराकरिता पात्र ठरणार नाही. असे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...