आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:मोदी सरकारच्या विरोधात भोकरदनला जिल्हा युवक काँग्रेसतर्फे मशाल घेऊन निदर्शने; गांधी यांच्यावर खोटे आरोप

फत्तेपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खा.राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात युवक काँग्रेसच्यावतीने भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल घेऊन निदर्शने करण्यात आले. सरकारने राहुल गांधी यांचा धसका घेतला असून त्यांनी बेरोजगारी, महागाई, कोरोना काळातील ढिसाळ नियोजन, कृषी विधेयकाचे तीन काळे कायदे अशा विविध प्रश्नावर राहुल गांधींनी सरकारची कोंडी केली होती. याचा राग मनात धरून सरकार सूडबुद्धीने राहुल गांधी यांच्यावर कारवाई करीत आहे. केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केलेल्या अग्निविर योजनेमुळे देशभरात आगडोंब उसळला असून युवकांमध्ये या योजने विषयी प्रचंड रोष आहे. ज्या प्रमाणे इंग्रज सरकार सामान्य भारतीयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत होते, त्याचप्रमाणे मोदी सरकार सामान्य भारतीयांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे अशी शक्यता राहुल देशमुख यांनी व्यक्त केले. परंतु जे काँग्रेस इंग्रजांना घाबरले नाही ते या धर्मांध शक्तीला घाबरत नाही आणि हे दडपशाहीचे सरकार घालून नक्कीच लोकशाहीचे सरकार काँग्रेस आणेल असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, गटनेते संतोष अन्नदाते, दादाराव देशमुख, रमेश जाधव, विशाल गाढे, जहीर शेख, प्रतापराव शिंदे, गलेब शहा, पंजाबराव देशमुख, रोशन देशमुख, महेश दसपुते, जुनेद शेख, रफिक कादरी, किशोर शिंदे, अजीम शेख, ऋषिकेश शिरोळे, सचिन गावंडे, प्रवीण निकाळजे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...