आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:शिंदी येथील विद्यार्थिनींची कबड्डी स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा क्रीडा प्रबोधिनी जालना येथे पार पडलेल्या १४ वर्षे वयोगटातील मुलींची कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील शिंदी येथील जिल्हा परिषद प्रशालेचा संघ यश मिळवित विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

सलग दोन वेळेस शाळेने हे यश मिळविले आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी डाॅ. भरत वानखेडे, विस्तार अधिकारी शिवाजी फोलाणे, गट समन्वयक वसंत शेवाळे, तालुका क्रीडा समनव्ययक वाहेद पटेल, एकनाथ सुरुशे यांनी खेळाडूंचा सत्कार केला. मुख्याध्यापक ए. एम. खडोळ, बी. एन. मोरे,आर. डी. सोनूने, एस. एम. पाठक, एस. एस. सुरुसे, के. डी. मरमट, बी. एन. जंजाळ, कृष्णा जंजाळ यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...