आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कबड्डीला गतवैभव प्राप्त करून द्या : नवलकर

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाल मातीतील तळागाळात खेळला जाणारा पारंपरिक कबड्डी खेळ वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा उभारी घेत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून प्रशिक्षकांनी गावपातळीवर कबड्डीपटू घडवत कबड्डीला गत वैभव प्राप्त करून द्यावे,असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी केले. मिशन १३२ के. व्ही. अंतर्गत वसुंधरा फाउंडेशन तर्फे कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षकांसाठी सुरू असलेल्या पायाभूत प्रशिक्षण शिबिराचा शुक्रवारी उत्साहात समारोप झाला. याप्रसंगी नवलकर बोलत होते.

यावेळी राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे, इंदरचंद तवरावाला, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अनिकेत म्हात्रे, डॉ. केतन गायकवाड, ज्ञानदेव पायगव्हाणे, सुषमा पायगव्हाणे, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा पायगव्हाणे - काटकर, शिबिर प्रमुख प्रा. सुभाष देठे यांची प्रमुख उपस्थिती होती. इंदरचंद तवरावाला यांनी कबड्डी असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. रमेशचंद्र तवरावाला यांच्याप्रमाणे कबड्डी खेळाच्या विकासासाठी आपले सहकार्य कायम राहिल अशी हमी दिली.

मंगल पांडे, ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी शुभेच्छा दिल्या. सहभागी प्रशिक्षक, शिबिरार्थींनी शिबिरातील अनुभव कथन केले. सूत्रसंचालन संजय येळवंते यांनी केल,े तर शिबिर प्रमुख प्रा. सुभाष देठे यांनी आभार मानले. या वेळी प्रशिक्षक बी. जे. पाटोळे,संतोष नागवे, राजाभाऊ थोरात, अंबादास गीते, दिनेश वाघ, विठ्ठल दिवटे, प्रदीप राठोड, अमोल पवार, गोपाल पायगव्हाणे यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

खेळाडूंच्या सुविधेसाठी लोकसहभाग वाढवावा
क्रीडा स्पर्धेची परंपरा असलेल्या जालना जिल्ह्यात कबड्डी खेळाच्या उत्थानासाठी नियोजनबध्द रितीने वाडी, वस्ती, तांड्यात जाऊन खेळाचे सूक्ष्म निरीक्षण केले. यातून प्रशिक्षकांचे पायाभूत प्रशिक्षण शिबिर हे पहिले पाऊल उचलले अाहे. गाव पातळीवर कारभारी, दानशूर व धुरीणांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत सुविधा पुरविण्यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार मनिषा पायगव्हाणे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...