आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग शिबिर; मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून होणार सुरुवात

फत्तेपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दर महिन्याच्या पहिला मंगळवार व तिसऱ्या मंगळवार रोजी दिव्यांग शिबिराचे मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले असून शिबिरात दिव्यांग व्यक्तीचे तपासणी करून त्यांना आवश्यक असलेले प्रमाणपत्र हे ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून वाटप करण्यात येणार आहे या शिबिराचा दिव्यांगानी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. डी. एम. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सोनी यांनी केले आहे.

भोकरदन येथे होत असलेल्या तपासणी शिबीरात हाडाचे अपंगत्व तपासणी, डोळ्याची तपासणी करून त्यांना आवश्यक असेल तर त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे जनतेला भोकरदन येथेच याचा लाभ मिळणार आहे. नागरिकांना जालना येथे जाण्यायेण्याचा खर्च देखील होणार नसून येथील ग्रामीण रुग्णालय सर्व आवश्यक असलेले प्रमाणपत्र तसेच तपासणी करून नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. हे शिबीर महिन्याच्या पहिला मंगळवारी व तिसऱ्या मंगळवारी प्रत्येक महिन्याला राहणार आहेत तरी भोकरदन तालुक्यातील सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी डॉ. दीपक सोनी यांनी केले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची खोटी कागदपत्रांचा आधार घेत आरोग्य विभागाची दिशाभुल करू नये असे आवाहनही केले आहे.

नागरिकांनी या शिबिराचा घ्यावा लाभ
भोकरदन ग्रामीण रुग्णालयात महिन्यातील पहिला मंगळवार व तिसरा मंगळवार रोजी हे शिबीर घेतले जाणार आहे. तरी दिव्यांग व्यक्ती ने सोबत आधार कार्ड घेऊन आपली तपासणी करून घ्यावी. तपासणी करून दिव्यांग व्यक्तीस आवश्यक असेल तर प्रमाणपत्राची नोंदणी करून हे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डॉ. डी. एम. पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकरदन

बातम्या आणखी आहेत...