आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण-उत्सव:विप्र फाउंडेशनच्या वतीने दीपावली स्नेहमिलन,  अन्नकूट उत्सव साजरा

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विप्र फाउंडेशन शाखा जालनातर्फे जालना येथील गायत्री मंदिरात ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २.३० या वेळेत िीपावली स्नेहमिलन तथा अन्नकूट उत्सव समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य सत्यनारायण व्यास, भक्तमाल कथा प्रवक्ता किशोर तिवारी, विप्र फाउंडेशनचे मराठवाडा उपाध्यक्ष बंकटलाल खंडेलवाल, विप्र फाउंडेशनचे अध्यक्ष रामनिवास गौड, सचिव पवन जोशी यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला माॅ. माताची आरती करून भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिव पवन जोशी यांनी दीपावली स्नेहमिलन आयोजनाची भूमिका विशद केले. तर प्रमुख अतिथी आचार्य सत्यनारायण व्यास यांनी विप्र समाजाच्या अंतर्गत रोटी व्यवहारा बरोबरच आता बेटी व्यवहार सुरू करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. तर भक्तमाल कथा प्रवक्ते किशोरजी तिवारी यांनी लवकरच विप्र फाउंडेशन व गायत्री संस्थान च्या वतीने आपण विप्र समाजासाठी लवकरच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. तसेच समाजाचे उत्थान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहन केले.

मराठवाडा उपाध्यक्ष बंकटलाल खंडेलवाल यांनी फाउंडेशनच्या शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी जालना शाखेचे अध्यक्ष रामनिवास गौड यांनी सर्वांना िदपावलीच्या शुभेच्छा देऊन येत्या २१ नोव्हेंबरला जालना शहरात येणाऱ्या भगवान परशुराम रथयात्रेच्या स्वागतासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.

यावेळी गायत्री संस्थानचे पदाधिकारी महेश सारस्वत, डॉ. मंगल शुक्ला, उमेश खंडेलवाल, प्रवीण शर्मा, पवन गौड, मारवाडी युवा मंचचे प्रांतीय अध्यक्ष उमेश पंचारिया, वैष्णव बैरागी समाजाचे रवींद्र बैरागी, ललित बिजावत, रामेश्वर जोशी, जुगल किशोर श्रोत्रीय, संजय सारस्वत, विष्णुदास खंडेलवाल, संतोष खंडेलवाल, अशोक शर्मा, अनिल शर्मा, नंदकिशोर गौड, रामदेव श्रोत्रीय, योगेश खंडेलवाल, गौरीशंकर खंडेलवाल, लक्ष्मीनारायण खंडेलवाल, सचिन दायमा, श्रीकिशन खंडेलवाल, ओमप्रकाश दायमा, रवींद्र आबोटी, प्रवीण पारिक, नारायण शर्मा, ताराचंद शर्मा, सोनू शर्मा, शंकर पारिक, निखिल सारस्वत, सुरेश पारिख, अ‍ॅड. आनंद झा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...