आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतूर तालुक्यातील आष्टी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोमवार दिपावली स्नेहमिलन घेण्यात आले. या वेळी जास्तीत जास्त शुल्क भरणाऱ्या व्यापाऱ्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासक अधिकारी एस. एन. बारगजे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे, मुळे याांची उपस्थिती होती. वेळी जास्तीत जास्त बाजार शुल्क सुपरव्हिजन शुल्क भरल्याबद्दल बाजार समिती तर्फे व्यापाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक गणेश वाघमारे (गणेश आडत दुकान), द्वितीय पारितोषिक मुक्ता बाळाभाऊ मिठे (शिवम आडत दुकान) तर तृतीय पारितोषिक अमोल सारडा (मेतल आडत दुकान) व वैभव घुगे (तुळजा भवानी आडत दुकान), उत्तेजनार्थ पारितोषिक बालासाहेब कोल्हे, बबन राऊत, गंगाधर सोळंके, पवन जाजु आदींना देण्यात आले.
यावेळी पुरस्कार प्राप्त व्यापाऱ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बाळासाहेब ढवळे यांनी केले. सुत्रसंचालन मोहन सोळंके यांनी तर सचिव कैलाश मुजमुले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश पोटे, केशव बनसोडे, वाल्मिक पोटे, बालासाहेब यादव, शेख अकबर यांनी परिश्रम घेतले. बाजार समितीला आले चांगले दिवस : दरम्यान गेले अनेक वर्षे बंद असलेल्या शेती मालाची खरेदी विक्री गेल्या वर्षी पासून मार्कट यार्ड मध्ये सुरू करण्यात आली असल्याने शेती मालाला ही चांगला भाव मिळत आहे या मुळे शेतकरी वर्गात ही समाधान व्यक्त केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.