आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तनसेवा:भगवंताच्या नामस्मरणाने करून घ्या जीवन धन्य, विष्णु महाराज सास्ते यांचे फत्तेपूर येथे निरूपण

फत्तेपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन शहराजवळच असलेल्या मौजे मासनपूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व रामकथा सोहळ्यानिमित्त शनिवारी विष्णू महाराज सास्ते यांच्या कीर्तनसेवेप्रसंगी महाराजांनी बोलताना आपले जीवन धन्य करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नित्य, निरंतर, नेहमी आणि सदोदित भगवंताचे नामस्मरण चालू ठेवले तर निश्चित आपले जीवन धन्य झाल्याशिवाय रहात नाही असा उपदेश दिला.

पुढे म्हणाले की, नवेनवे हा आत्मा-परमात्मा होऊन भगवंताच्या लीन होतो आणि भगवंत भक्तीचा मनुष्याला एवढा ध्यास लागतो कि मनुष्य नेहमी चांगले कार्य करीत राहतो. चांगले कार्य करण्याकरिता ऊर्जा जर कशात मिळत असेल तर ते भगवंत भक्तीमध्ये मिळते. त्यामुळे नेहमी सुखदुःखात म्हणजे कोणत्याही वेळेला भगवंताचे नामचिंतन जेवढे शक्य होईल तेवढे करीत रहा. नेहमी चांगल्यांची संगत करा, वाईट कर्म करू नका, एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत रहा आपल्याला जीवनात काहीच कमी पडणार नाही असे भावनिक आवाहनही आदरणीय विष्णु महाराज सास्ते महाराजांनी केले. यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज गायनाचार्य मंडळी किशोर महाराज दिवटे गुरुजी, प्रदीप महाराज बनकर, गंगावणे महाराज, संतोष महाराज पवार, दत्ता महाराज जाधव, प्रभुअप्पा तळेकर, रामायणाचार्य अशोक महाराज साबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अनिल उबाळे यांच्या नियोजनात पार पडला.

बातम्या आणखी आहेत...