आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तनसेवा:स्त्रीभ्रूण हत्येचे पाप करू नका, नाही तर नरकात देखील जागा मिळणार नाही; कोसगाव येथील कीर्तनात सत्यपाल महाराज यांचे निरूपण

पिंपळगाव रेणुकाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वंशाला दिवा लावण्यासाठी मुलगा हवा म्हणून समाजात मुलीच्या जन्माविषयी द्वेष निर्माण केल्या जातो. मुलाच्या हट्टापायी अनेक महिलांना चुका नसतानाही सासरच्या मंडळीकडून नाहक ञास दिल्या जातो. आज समाजात मुलगाच पाहिजेत म्हणून दिवसेंदिवस गर्भातच स्ञी-भ्रुण हत्यचे पाप केल्या जाते. परंतु जो कोणी स्ञी-भ्रुण हत्येचे महापाप करतो त्याला नरकात देखील जागा मिळणार नसल्याचे सत्यपाल महाराज म्हणाले.

भोकरदन तालुक्यातील कोसगाव भंडारगड येथे कीर्तन सेवेचे आयोजन सामाजिक कार्येकर्ते दिलीप वाघ यांनी केले होते. त्यावेळी सत्यपाल महाराज बोलत होते. आज या जगात एकच पाञ असे आहे की ते लोभा विना प्रेम करते आणि त्याचे नाव आहे आई. समुद्रातील पाण्याची शाई आणि आकाशाचा कागद जरी केला तरी आईची महती लिहता येणार नसल्याचे नाही. एवढे महत्त्व एका स्ञीचे आपल्या जिवनात आहे. आई-वडील हे घरातील दोन मुख्य खांब आहे. संपूर्ण घराचा डोलारा त्यांच्यावर अवलंबून असतो.

ज्या घरात आई, वडील असतात त्या घरात भगवान परमात्मा सहवास करतो. यासाठी प्रत्येकाने एक वेळ भगवतांची पुजा अर्चा नाही केली तरी चालेल परंतु आपल्या जन्मदात्या आई-वडीलांची सेवा नक्की करावी. समाजात जगताना माणसाने आपले पाय जमिनीवर ठेवुनच जगले पाहीजे. कारण हवेत उडणारी माणसं ही हवेतच जात असतात. समाजात कपटी वृत्ती असणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. जो-तो आपलं काम काढून मतलब साधण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अशा लोकांचा भगवंत हिशोब केल्याशिवाय राहत नाही.तर जे लोक मनाने साफ व सच्ची असतात अशा लोकांना भगवंत नेहमीच मदत करीत असल्याचे महाराजांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप वाघ मित्रमंडळाने परिश्रम घेतले.

कामात राम दिसतो
वरूड बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाघ यांचे परिसरातील कुठल्याही सामाजिक किंवा धार्मिक कार्यात योगदान असते. शिवाय समाजात जनजागृती आणि तसेच तरुणांची व्यसनापासुन सुटका व्हावी यासाठी कुठल्याही मागेल त्या गावात नामांकीत महाराजांच्या किर्तनाची तारीख देत स्वतःहा लागेल तो खर्च करतात. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि मला कामातच राम दिसतो असे दिलीप वाघ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...