आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद मिलन:हमको अपने वतन से न समझो जुदा, जिना मरना अपना यही

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईद मिलन, गझल, मुशायरा,लोकहित संघटना, कला-क्रीडा फाउंडेशनचा पुढाकार

हमको अपने वतन से न समझो जुदा, जिना मरना हमारा यही पर तो है, ईज्जते यूँ उछालो न पुरखों की तुम उनका सारा असासा यहीं पर तो है ही गझल सादर केली मुशायर कार्यक्रमाचे अध्यक्ष फैज सुभानी यांनी.अखिल भारतीय लोकहित संघटना व कला-क्रीडा दूत फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी रात्री शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये ईद मिलन तसेच गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून रेखा बैजल, कासिब कालीब (जाल्हनवी), प्रा. अशोक खेडकर, आत्माराम जाधव, पवन ठाकूर, प्रा. सुभाष मगर, अझहर फाजी, सुनील लोणकर आदींची उपस्थिती होती.

कवी प्रा. अशोक खेडकर यांनी आपल्या रचनेत म्हटले, शोधू नका इथे-तिथे गळा माझा कापणारे माझेच आहात होते, टाळून मला शेजाऱ्यांनी दिली मेजवानी, डोळे माझे भाकरीच्या शोधात होते. तर रेखा बैजल यांनी संभलते संभलती नही है ख्वाईशे मकाम आया है तब भी ऊछलती है ख्वाईशे अपना रंग बदलती है उम्र के साथ, लेकिन वही तडप देती है ख्वाईशे ही हिंदी रचना सादर केली.

मेहकरचे प्रा. सुभाष मगर यांनी आपल्या कवितेत मीच तुम्हाला खरा आधार आहे, संकटांनो या, खुले हे दार आहे रित कसली प्रीत कळण्याची तुझी हि धांदलेली वाटते तलवार आहे असे म्हटले आहे. गंगाखेडचे आत्माराम जाधव यांनी मी कसे सांगू कुणाचा त्रास आहे, बोलणाऱ्याच्याच गळ्याला फास आहे का फुगेवाला विकतो त्या फुग्यांना, ज्या फुग्यांच्या आत त्याचा श्वास आहे ही कविता सादर केली. डॉ. राज रणधीर यांनी आपली गझलांचे सादर केली.

यात भिंती रित्या घराच्या शोधूनी शांत झाल्या, गेली कुठे घराची म्हणती मला खुशाली, चिव चिव करीत आल्या सजला घरात खोपा, लावून ओढ मजला चिमणी कुठे उडाली. प्रारंभी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शेख चाँद पी.जे. यांच्या वतीने सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...