आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय योगा दिन:करा योग राहा निरोग, शरीर सुदृढतेसाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय योग दिन जालना जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मंगळवारी सकाळी शिबीर घेण्यात येऊन योगासनाचे विविध प्रकार सादर करण्यात आले. निरोगी राहण्यासाठी योगा किती महत्वाचा आहे, याबाबत योग प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. प्राचीन लक्ष्मी नृसिंह मंदिर, परतूर

परतूर

येथील प्राचीन लक्ष्मीनरसिंह मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉ. हरीप्रसाद ढेरे, शुभम सातोनकर यांनी विविध योगासने व प्राणायाम घेतले. योग शिक्षक प्रा. सतीश कंडारे यांनी योगाचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. स्वप्नील मंत्री यांनी यावर्षीच्या “योगा फोर हुमानिटी” या थीम वर मार्गदर्शन करीत योगाला दैनंदिन जीवनाचा घटक बनवण्याचे आवाहन केले. यावेळी साप्ताहिक योग शिबिर घेण्याचा संकल्प घेण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर आंबेकर, डॉ. रवींद्र बरकुले, डॉ. सुरासे, नंदकिशोर चौहान, अर्चना चौहान, संदीप उबाळे, शशांक वाळिंबे, गोविंद दहिवाळ, शक्ती पवार, धर्मेंद्र पवार, विजय पवार, पूजा पवार, मंगल पवार, दुर्गा पवार, रेणुका पवार, भारती काळे, ज्योती काळे, उमेश हिवाळे उपस्थित होते.

जाफराबाद शहर

आपल्या आयुष्यातील किमान एक तास आपल्या आरोग्यासाठी दिल्यास आपले शरीर सुदृढ व निरोगी राहुन आपले आयुष्यमान वाढते त्यामुळे रोजनिशी सकाळ सायंकाळ प्राणायाम, योगासने, चालणे, शारीरीक विविध कवायती करणे हे प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करावे व योग करुन निरोगी रहावे, असे प्रतिपादन योग गुरु एकनाथ घाटगे यांनी योग शिबिरात केले. भाजपा तालुकाच्या पुढाकारातुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणामध्ये योग शिबीराचे आयोजित करण्यात आले. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा अत्यंत योग्य उपाय आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योगा हा नक्कीच चांगला उपाय असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी शरीर सुदृढ तथा फिट राहण्यासाठी आष्टांग योगाची आठ अंग आणि त्याचे महत्व सांगितले. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारना, ध्यान आणि समाधी याचेही महत्व सांगत नमस्कारासन, वज्रासन, अर्धचंद्र आसन, नटराजसन, मंडूकासन, सुर्यासन, गोमुख आसन, शवासन, भुजंगासन, सर्वांगआसन, मत्सासन, वक्रासन यासह विविध योगासनांचे प्रात्यक्षिके करुन दाखविली. यावेळी सुरेश दिवटे, गोविंदराव पंडीत, साहेबराव कानडजे, दगडुबा गोरे, दिपक वाकडे, नगरसेवक अनिल बोर्डे, उत्तम दुनगहू, सुरेश जंजाळ, नाना पंडीत, राजु वैद्य, संदिप सोळंके, संदिप वाकडे, संदीप पाटील, शिवाजी फोलाने, सुनिल मुळे, प्रभाकर गाढे, समाधान सरोदे, उमेश दुनगहू, प्रकाश ठाकुर, गणेश भोपळे, संदीप पाटील, विठ्ठल वखरे, सी. आय. पठाण, मंगेश गायके, दिलिप माळी, गजानन गोफणे, अर्चना दिदी, शंकुतलादिदी, अनिता ठाकुर, शारदा गोफणे, रेखा टोंपे आदींची उपस्थिती होती. श्री रामेश्वर विद्यालय केदारखेडा

केदारखेडा

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील श्री रामेश्वर विद्यालयात योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एन एल. गिऱ्हे, के. के. चोरमारे, एन. एस. तळेकर, पी. बी. इंगळे, एस. एल. गिऱ्हे, एस. बी. पोटे, केशव खेडेकर, अंकुश सोनवणे, टी. आर. फोलाने, व्ही. पी. वाघ, एस. आर. पंडित, प्रा. दीपक काळे, विनोद तांगडे, मनोहर गिऱ्हे, सुनील आडे, हरिभाऊ उबाळे, एस. जी. भवर, श्रीराम मुरकुटे, विष्णू धसाळ आदी उपस्थिती होती. जेईएस महाविद्यालय

जालना

येथील जेईएस महाविद्यालयात राष्ट्रीय ‌सेवा योजना, एनसीसी व क्रीडा विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षक बॉबी अग्रवाल, अक्षय धोंडगे यांनी योगासने, प्राणायाम उपस्थितांकडून करून घेतले. प्राणायाम चे महत्व पटवून सांगितले. निरोगी आयुष्य जगण्यासाठी रोज योगासने, प्राणायाम केले पाहिजेत असे अग्रवाल यांनी सांगितले, यावेळी प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज, प्रा. प्रवीण बाफना, प्रा.करूणा वासनिक, डॉ. हेमंत वर्मा, प्रा. डॉ. राजेंद्र सोनवणे, प्रा. करण सातुरे, प्रा. एफ. एम. मोहिते, डॉ. किशोर बिरकायलू, प्रा.राहुल सारस्वत, प्रा.मोनिका काळे, प्रा. शिवाजी वानरे, प्रा. विजय शिंदे आदी उपस्थित होते. विधी सेवा प्राधिकरण

जालना

जिल्हा सेवा प्राधिकरणतर्फे योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. जी. गिमेकर, प्रास्ताविक आर. आर. अहिर, आर. एम. गव्हाणे, योग सत्रात योग प्रशिक्षका तथा सहायक सरकारी वकील जयश्री बोराडे आदी उपस्थित होते. शहापूरला वृक्षारोपण

शहापूर

अंबड तालुक्यातील शहापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी योगा, पद्मासन, ताडासन, भद्रासन, वक्रासन, भुजंगासन, वृक्षासन, कपालभारती आदी योगा करण्यात आली. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, डीवायएसपी सुनील पाटील, शितलकुमार बल्हाळ, मुख्याध्यापिका कुलकर्णी, फोके, सरपंच बाबासाहेब गायकवाड, दशरथ साठे, भागुजी मैंद. राधाकिसन तळेकर, राजेंद्र साळुंके, अमोल पाष्टे, राजेंद्र माने, राजेंद्र छल्लारे, पवण पवार, देवकर आदी उपस्थित होते. यशवंत महाविद्यालय

धावडा । येथील यशवंत कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात योग दिनी शिबीरात गायकवाड यांनी योगाचे प्रकार करून घेतले. यावेळी प्राचार्य गवई, वाघमारे, दुतोंडे, वानखडे आदी उपस्थित होते. शहीद भगतसिंग हायस्कूल

जालना

तालुक्यातील दरेगाव येथील शहीद भगतसिंह हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिरात विविध प्रकारचे आसनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. मुकुंद जहागीरदार, मुख्याध्यापक वसंत घुले, रोहिदास आडे, भरत पाटील, नारायण मुंडे, वैष्णव जगदीश, सुभाष दुबे, संजय जाधव, विठ्ठल भोजने, पिवळ, समाधान ढेंगळे यांच्यासह आदी उपस्थित होते. परतूर शहर

परतूर शहरातील मोंढा भागातील रहिवाशी अनुपमा भारुका यांनी जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्याना योगाचे धडे दिले. लालबहादूर शास्त्री विद्यालय आणि द्रोपदाबाई आकात इंग्लिश स्कूल मध्ये देखील मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगशिक्षिका अनुपमा भारुका यांनी विद्यार्थ्यांना योग शास्त्रातील विविध प्रात्यक्षिके करून दाखविली.आजच्या धावपळीच्या जीवनात नियमित व्यायाम करणे, योगक्रिया करणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक वसंतराव सवणे, शिलजा सनील, त्र्यंबक घुगे, राजकुमार राऊत, सुमय्या खान, परी खान, जाधव उपस्थित होते. गुरुदेव इंग्लिश स्कूल

रामनगर

तालुक्यातील भिलपूरी येथील गुरुदेव इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये वरकड, नागरे यांनी विद्यार्थ्यांना योगा करून विशेष मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्या अनिता शिंगणे, ज्ञानेश्वर भुतेकर आदी उपस्थित होते. जीईएस स्कूल

राजूर

येथील जीईएसस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधना व आरोग्याबाबत माहिती देण्यात आली. यावेही मोहिनी मापारी, लक्ष्मीकांत मापारी, राजू मिसाळ, प्रा. ज्ञानेश्वर पुंगळे, प्राचार्या प्रा. आशा पुंगळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मन आणि मेंदूचा व्यायाम म्हणजे योग : बोडखे

मंठा

आपले शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर व्यायाम आवश्यक आहे. पण एकाच वेळी मन, मेंदू आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग आणि प्राणायाम आवश्यक आहे, असे प्रतिपादन पतंजली योग पिठाच्या प्रशिक्षिका पद्मिनी बोडखे यांनी केले. येथील रेणुका माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य सचिन राठोड, उपमुख्याध्यापक आर.के.राठोड, पर्यवेक्षक डी.एस बुलबुले, डॉ. स्वाती पवार, प्रा.सोनाजी कामिटे, प्रा. साधना जुंबड, सुजाता शिंदे, सखूबाई राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी योग प्रशिक्षिका पद्मिनी बोडके यांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारची योगासने करून घेतली. यामध्ये ताडासन, कटिचक्रासन, वक्रासन, शशकासन, वज्रासन आदीसह प्राणायामचा समावेश होता. आसनामुळे आपल्या शरीराला कशा प्रकारे लाभ मिळतो हे देखील त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपले मन एकाग्र करायचे असेल, शरीर ऊर्जामय आणि बुद्धी तल्लख ठेवायचे असेल तर योग व प्राणायाम आवश्यक आहे. योगासने आणि प्राणायामाने आजार पळवता येतो आणि शरीर सुदृढ आणि निरोगी राहते, असे त्यांनी सांगितले. प्रा.संजय गोर्डे यांनी देखील विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती. लक्ष्मणराव जाधव विद्यालय, गुंज बुद्रुक

गुंज बुद्रुक घनसांवगी तालुक्यातील गुंज बुद्रुक येथील लक्ष्मणराव माधवराव जाधव विद्यालयात क्रिडा शिक्षक रामदास वाघमारे यांनी विद्यार्थ्यांचे योग प्रात्यक्षिक घेऊन जागतिक योग साजरा केला. याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. प्रभाकर शेळके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रल्हाद जाधव, प्रभाकर खरात, विष्णू घुमरे, अभिमान्यु टोके आदींची उपस्थिती होती. अंबड शहर

अंबड येथील छत्रपती योग निसर्गोपचार व क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सुरु असलेल्या निःशुल्क योग साधना शिबिराच्या पाचव्या दिवशी आर्ट ऑफ लिव्हिंग अंबड परिवारातील योग शिक्षक पांडुरंग शिंदे, तारा तांबे, यांनी चंद्रकला चित्राल, फेरोज खान, गितांजली ढोले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रार्थनेने सुरुवात करून योगसत्र घेण्यात आले. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, न्यायाधीश प्रल्हाद भगुरे, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ नरके आदींची उपस्थिती होती. फेरोज खान यांनी योग दर्शन शास्त्राचा परिचय करून अष्टांग योग आणि वर्तमान परिस्थितीत प्रसन्न आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून योग साधना क्रिया घेतली. सुत्रसंचालन देवा चित्राल यांनी तर डॉ. आशा मालू यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...