आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार:ग्रापंच्या संग्राम आयडीवर खासगीत कागदपत्रांचा केला जातोय व्यवहार;भोकरदन तालुक्यातील प्रकार

पारध2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आपले सरकार महा-ई-सेवा केंद्र, व संग्राम केंद्र यांना परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी केंद्राचे कामकाज होत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हास्तरावर प्राप्त झाल्या आहेत. अशा केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र यावर कोणतीच चौकशी झाली नाही. ग्रामपंचायत साठी देण्यात आलेल्या आयडी खासगी केंद्रावर देत त्यावर कागदपत्रे काढली जात असल्याचा प्रकार होत आहे.

संगणकीकृत ग्रामपंचायत महाराष्ट्र या संकल्पणेखाली शासनाकडून ग्रामपंचात ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायत साठी असलेल्या संगणक परिचालकाला एक स्वतंत्र आयडी देण्यात आला आहे. यावरून कागदपत्रे माफक दरात देत ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे हा उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. मात्र ग्रामपंचायत साठीच्या आयडी क्रमांकाचा गैरव्यवहार या प्रकाराची चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हा विभागावरून देण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही कसलीही कार्यवाही झाली नाही.

भोकरदन तालुक्यातील जवळपास सर्वच संग्राम केंद्र हे दलालांमार्फत चालवले जात आहे. असे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. ज्यांना आयडी दिले आहे अशांवर कोणत्याही प्रकारची शासनाचे नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे नागरिकांची लूट होत आल्याचे चित्र दिसत आहे. उलट यांच्या मार्फत आपण प्रमाणपत्र काढले तर ते लगेच देण्यात येतात. जिल्ह्यातील बोगस संग्राम केंद्र चालकांना चाप बसणार की अशीच लूट चालू राहणार आहे.

राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा पोहोचविण्यासाठी संग्राम केंद्रआपले सरकार महा ई सेवा केंद्र, तसेच शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागामार्फत ग्रामपंचायत स्तरावर सुरु केलेली केंद्रे आहेत. आपले सरकार सेवा केंद्र, संग्राम सेवा केंद्र यांचे स्थापन तसेच नियंत्रण करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आपले सरकार महा ई सेवा केंद्र धारक शासनाचे मार्गदर्शक सुचनेनुसार कामकाज करीत नसल्याच्या तक्रारी वढल्या आहेत. तसेच संबंधीत संग्राम केंद्र धारकास ज्या ठिकाणी आपले केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी संबंधीत केंद्र चालक काम करीत नसुन ते दुसर्‍या ठिकाणी विनापरवानगी स्थानांतरीत होवुन दलाला मार्फत केंद्राचे कामकाज करित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.

त्यामुळे संग्राम केंद्र आपले सरकार महा ई सेवा केंद्र, धारक यांना ज्या ठिकाणी केंद्र मंजूर करण्यात आले आहे, त्याच ठिकाणी कामकाज करणे बंधनकारक आहे. त्यानुसार चौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार, सेतु लिपीक तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी यांची यादवारे नियुक्ती करण्यात आली आहे. सा पथकाने ग्रामीण भागात जावुन सत्य परिस्थितीतीची पडताळणी करावी अशी मागणी केली जात आहे. ज्यामुळे शासनाच्या आयडी वरून गैरप्रकार होणारे थांबतील.

पिंपळगाव कोलते ग्रापंला दिलेला आयडी पारधला
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील संग्राम केंद्र चालक यांनी आपली आयडी पारध येथील एका खसगी केंद्रात दिला आहे. हा प्रकार नियमबाह्य ठरतो. या केंद्रातून कागदपत्रेही एडीट करून दिले जातात हा प्रकार चुकीचा आहे. ही बाब लक्षात घेता गैरप्रकार थांबावे यासाठी चौकशीची गरज आहे. शासनाकडून दिलेल्या आयडीचा गैरवापर केला जात आहे ही बाब चुकीची आहे.- समाधान तेलंग्रे, महाईसेवा केंद्र चालक, पारध

प्रकाराची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल
शासनाकडून ग्रामपंचायत कार्यालय येथे हे स्वतंत्र आयडी दिलेले आहेत. जे केंद्र चालक आपले केंद्र दिलेल्या ठिकाणी चालवत नसेल त्याचा गैरप्रकार करत आहेत. अशांची चौकशी करून संबंधित केंद्र चालक यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.- मंगेश जाधव, संग्राम जिल्हा समन्वयक

बातम्या आणखी आहेत...