आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जखात्यात जमा:अनुदानाची रक्कम कर्जखात्यात जमा करू नका : शिवाजी शेजूळ

रामनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील रामनगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत रामनगरसह परिसरातील बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी. एम. किसान योजनेच्या दोन हजार रक्कम व इतर शासकीय अनुदान जमा झाले. बँकेने बहुसंख्य शेतकऱ्यांचे खाते होल्ड करून ठेवले अाहे. या अनुदानाच्या रकमा या कर्जखात्यात जमा करून घेत आहे. अगोदरच शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. तरी ही बँकेने शेतकऱ्यांच्या अनुदानित रकामा कर्ज खात्यात जमा करू नये. अशी मागणी रामनगर येथील युवासेना कार्यकर्ते शिवाजी शेजूळ यांनी केली आहे.

रामनगर परिसरात सोयाबीन काढणीला आल्यानंतर पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. तसेच गत चार वर्षापासून ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना संकट आदीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेता. अनुदानाच्या रकमा या कर्ज खात्यात वर्ग करू नये, याबाबत बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या खातेदारांना घेऊन तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना लवकरच निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...