आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोहित्र वाहतुकीसाठी वाहन व्यवस्थेची तरतुद रोहित्र दुरूस्त करणाऱ्या एजन्सी किंवा महावितरणकडे आहे. त्यामुळे नादुरूस्त किंवा दुरूस्त रोहित्रांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी कंत्राटदाराशी किंवा कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. शेतीला सिंचनासाठी सुरळीत विद्युत पुरवठयाची आवश्यकता असते. त्यादृष्टीने महावितरण प्रयत्नशिल आहे. मंजूर भारापेक्षा अधिक विघुत भाराच्या वापरामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांनी प्रमाणित कॅपासिटर बसवून अखंडित वीज वापराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून डॉ. गोंदावले यांनी सांगितले, ग्रामीण भागातून वीज बिलापोटी ग्राहकांकडून जमा करण्यात आलेल्या बिलांचा भरणा काही ठिकाणी महावितरणकडे तत्काळ होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
वीज कर्मचारी व वीज बिल भरणा केंद्रानी त्यांच्याकडे संकलीत झालेली बिले तत्काळ महावितरणकडे जमा करावी. ग्राहकांनीही वीज बिलापोटीचे व्यवहारही पावतीशिवाय करू नये. तीन एचपी मंजूर असताना पाच एचपीचा पंप वापरणे अशा कृषीपंपधारकांनी वीज पुरवठयासाठी किंवा अतिरिक्त भाराकरिता अर्ज करून नियमाने वीज जोडणी घ्यावी. कृषीपंपास एल अॅड टी, क्रॉम्टन,ग्रिव्हज, सुबोधन, कॅपको सारख्या आएसआय मानांकन असलेले कॅपासिटर बसविण्यात यावे. कॅपासिटर हा शेतक—यांच्या पंपाचे आणि रोहित्राचेही बिघाड टाळतो. त्यामुळे शेतीला अंखडित वीज पुरवठा करणे सोयीचे होणार आहे, असे डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.