आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात केंद्र प्रमुखांची दीडशेहून अधिक पदे रिक्त आहेत. आता सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्याने दहा वर्षांनंतर केंद्र प्रमुखांच्या पदोन्नतींना मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे असले तरी रिक्त पदे भरताना सरळसेवा, विभागीय परीक्षेच्या अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे निव्वळ प्रभार नको, तर अभावितपणे रिक्त पदे भरावी, अशी मागणी आता शिक्षकांकडून केल्या जात आहे. जिल्ह्यात दोन हजार दोनशेहून अधिक शाळा आहे. या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दहा ते बारा शाळा मिळून एक प्रमाणे १८० केंद्र अस्तित्वात आहेत.
यावर नियमित केंद्र प्रमुखांची नेमणूक करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या जवळपास ३० ठिकाणी केंद्रप्रमुख कार्यरत असून, उर्वरीत दीडशेहून अधिक केंद्र प्रमुखांची पदे रिक्त आहे. रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने मागिल दहा वर्षांपासून प्राथमिक शिक्षण विभागाने पावले उचललेच नव्हते. शेवटची पदोन्नती प्रक्रीया २०१२-१३ मध्ये शिक्षण विभागाने काढली होती. तेव्हापासून पदोन्नतीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचे पावले उचलण्यात आले नव्हते. आता प्राथमिक शिक्षण विभागाने केंद्र प्रमुखांची रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
जवळपास ५३० शिक्षकांची यादी पंचायत समितीनिहाय प्रसिद्ध करण्यात आली असून, बुधवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. तर आक्षेप दुरुस्ती करून शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी शिक्षण विभाग अंतीम यादी प्रसिद्ध करणार आहे. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे शंभर टक्के भरण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहे. प्रत्यक्षात मात्र, येत्या काळात शासन सरळ सेवा परीक्षा, विभागीय परीक्षा घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.
अशा परिस्थितीत केंद्रप्रमुखांचा प्रभार शिक्षकांच्या माथी मारण्याच्या तयारीत शिक्षण विभाग आहे. केंद्रप्रमुखांचा प्रभार मिळाल्यानंतर दोन ठिकाणचा कारभार सांभाळताना शिक्षकांना प्रचंड कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत केंद्र प्रमुखांची पदे अभावितपणे भरावी, अशी मागणी आता शिक्षक संघटनांकडून केल्या जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने शिक्षण विभाग निर्णय घेणार की, नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल.प
जूनपर्यंत सहा केंद्रप्रमुख सेवानिवृत्त
जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची एकूण १८० पदे मंजूर आहेत. या मंजूर पदावर जवळपास ३० केंद्रप्रमुख कार्यरत असून, उर्वरीत केंद्राचा कारभार सध्या प्रभारावरच आहे. अशात येत्या जून महिन्यापर्यंत आणखी जवळपास सहा केंद्रप्रमुख सेवानिवृत्त होणार आहे. तत्पूर्वी केंद्र प्रमुखांची पदे भरणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.