आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवे यांचा इशारा:भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नका

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश सामर्थशाली झाला आहे, यापुढे पाकिस्तान भारतावर दहशतवादी कारवाया करू शकत नाही. तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची तयारी व ताकद आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये, असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिला.

जालना येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल जरदारी भुट्टो यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. दानवे म्हणाले, हताश झालेल्या पाकिस्तानकडून आता भारत देशाविषयी द्वेष भावनेने बोलल्या जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्वाचे स्थान मिळवून देत आहे. भारताकडे आता वाकड्या नजरेने पाहिल्यास भारताकडून पाकिस्तानास जशाच तसे उत्तर देण्यास भारत देश सक्षम आहे. भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया आता पाकिस्तान करू शकत नाही कारण दहशतवाद पोहोचवीणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान आता कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे भारत देशा या प्रकारची वक्तव्य केल्या जात आहे.

त्यामुळे पाकिस्तान सरकारचा भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य रामेश्वर भांदरगे, अतिक खान, सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, अर्जुन गेही, भागवत बावणे, बाबासाहेब कोलते, प्रा. राजेंद्र भोसले, सुनील खरे, संजय आटोळे, सुनील पवार, कपिल दहेकर, शर्मिष्ठा कुलकर्णी, बबनराव सिरसाठ, डॉ.रमेश तारगे, रोहित नलावडे, सोमेश काबलिये, स्नेहा जोशी, रोषण चौधरी, विजय कामड, डोंगरे, देसरडा आदी होते.

बातम्या आणखी आहेत...