आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:आरटीई कोट्यासाठी विद्यार्थ्यांचे दुपटीने अर्ज; 17 ‎ मार्चची डेडलाइन, पालकांच्या हाती पाच दिवस‎

जालना‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीई कोट्यातून प्रवेश देणारी‎ राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रिया‎ सुरू झाली असून शाळांच्या‎ नोंदणीनंतर विद्यार्थ्यांच्या अर्जांना‎ सुरूवात झाली आहे. यावर्षी २‎ हजार २७३ जागांवर प्रवेश मिळणार‎ आहेत. यासाठी नोंदणीला १ मार्च‎ करण्यात आली असून आजपर्यंत‎ चार हजारांवर अर्ज आले आहेत.‎ अर्ज करण्यासाठी पालकांच्या हाती‎ केवळ पाच दिवस बाकी राहिले‎ आहे.‎ वर्ष २०२३-२४ या वर्षी करिता‎ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये‎ अंतर्गत आरटीई प्रवेश पात्र शाळांचे‎ व्हेरिफिकेशन २३ जानेवारी २०२३‎ पासून सुरु केले. तर याला १०‎ फेब्रुवारी रोजी ब्रेक देण्यात आला.

‎बालकांचा मोफत व सक्तीच्या‎ शिक्षणाचा अधिकार अधिनियम‎ २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के‎ प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने‎ राबविण्यात येतेे. त्यानुसार वर्ष‎ २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी‎ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची‎ ऑनलाईन सोडत काढून जालना‎ जिल्ह्यात २९१ शाळांमध्ये २ हजार‎ ७९५ विद्यार्थ्यांना संधी देण्यात‎ आली. वर्ष २०२३ - २४ साठी‎ प्रक्रीया सुरू केली असून २८४‎ शाळांची १०० टक्के करण्याला यश‎ मिळाले. तर यावर्षी २ हजार २७३‎ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले‎ जाणार आहे.‎

पालकांचा प्रतिसाद‎
आरटीई कोट्यातील प्रक्रियेसाठी‎ पालकांचा प्रतिसाद मिळत आहे. या‎ कोट्यातून अर्ज करण्यासाठी अद्याप‎ पाच दिवस हाती राहिले आहे.‎ पालकांनी वेळेत प्रक्रीया पार‎ पडल्यास पुढील कार्यवाही पुर्ण‎ करण्यासाठी शिक्षण विभागही‎ अॅक्शन मोडवर काम करणार‎ असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी‎ कैलास दातखीळ यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...