आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा; मतदारांनी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावे

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीत विद्यापीठ विकास मंचाचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आमदार संतोष दानवे यांनी व्यक्त केला.पदवीधर मतदारांना आपली मतदार नोंदणी करून घेण्यासाठी जालना येथील चमन जवळ काळूंका माता मंदिरा समोर विद्यापीठ विकास मंचच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिनेट सदस्य भास्कर दानवे, विजय देशमुख, प्रा. नाना गोडबोले, अंकिता पवार, डॉ. विक्रम दहीफळे, डॉ. सोमीनाथ खाडे आदींची उपस्थिती होत.

आमदार दानवे म्हणाले, शिक्षणामुळे माणुस घडतो त्याला चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठात चाललेला गोंधळ थांबवण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांच्या पाठीशी रहावे. विद्यापीठ विकास मंचाचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. गजानन सानप यांनी विद्यापीठ विद्यार्थी विकास केंद्रित झाली पाहिजेत प्राध्यापकाच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठ विकास मंच सदैव कार्य करत आलेला आहे केवळ आंदोलनातून प्रश्न सुटणाऱ नाहीत त्यासाठी सत्ता आवश्यक असते. यावेळी डॉ. भगवानसिंग डोभाळ, नरहरी शिवपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. अंबरवाड़ीकर यांनी तर अॅड. बाबासाहेब इंगळे यांनी आभार मानले

बातम्या आणखी आहेत...