आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:डॉ. सुनीला कांडलीकर, अबोटी, साबू यांना डॉ. कुटेंच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील वैद्यकीय सेवेच्या योगदानाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनीला कांडलीकर, जनरल फिजिशियन डॉ. रमेशचंद्र अबोटी आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. सुरेश साबू यांचा आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयएमए हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. प्रारंभी आयएमएचे अध्यक्ष डॉ.राजीव जेथलिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा, आयएमए परिवारातील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

तसेच रक्तदान पंधरवड्यात रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या १५ हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. गेल्या ४० वर्षांपूर्वी पुरेशी साधने, तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने नसताना काळाची गरज ओळखून पुरस्कारार्थी डॉक्टरांनी जालनेकरांना दिलेली वैद्यकीय सेवा नवीन पिढीसाठी दीपस्तंभसारखी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजीव जेथलिया म्हणाले. डॉ. रवींद्र कुटे यांनी आयएमए जालनाच्या उपक्रमांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. डॉक्युमेंटरीद्वारे या सर्वांचा परिचय देत त्यांनी बजावलेल्या वैद्यकीय सेवाकार्याचा आढावा सर्वांसमोर सादर केला. याप्रसंगी डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ. प्रकाश सिगेदार यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शिरीष भरतीया, डॉ. प्रकाश आंबेकर, डॉ. सोनल रुणवाल, यांनी केले. सचिव श्रेयांश गादिया यांनी आभार मानले. आयएमएचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...