आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समता व बंधुता:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाजात समता व बंधुता : डॉ. फोलाणे

भोकरदन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधूता, स्वातंत्रता व त्यांनी केलेले आंदोलने, सत्याग्रह, याबद्दल माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज समाजात समता निर्माण झालेली असून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित शिक्षण घेतोय हे डॉ. आंबेडकर यांच्या संविधानामुळेच शक्य झाले आहे. प्रज्ञा, शील, करुणा या मार्गावर प्रत्येकाने चालावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. डी. एस. फोलाणे यांनी केले.

भोकरदन शहरातील स्व.ॲड.एस.डी.देशमुख महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. आर. टी. पाबळे, प्रा. एस. एस. जाधव, प्रा. ए. जी. तळेकर, प्रा. एस. बी. जोशी, पी. एस. तळेकर, एस. एस. गाढे, वाय. बी. देवडे आदी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...