आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:डॉ. देगावकर यांना बडतर्फ‎ करण्याच्या मागणीसाठी उपोषण‎

अंबड‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय‎ अधिक्षक डॉ. दत्ता देगांवकर यांना‎ बडतर्फ करण्यात यावे, या‎ मागणीसाठी उपविभागीय अधिकारी‎ कार्यालयासमोर महेंद्र शिलवंत व‎ इतरांनी सोमवारपासून उपोषण सुरु‎ केले आहे.‎ वैद्यकीय अधीक्षक डॉ. देगावकर‎ मनमानी कारभार करीत असून या‎ रुग्णालयात अनेक साहित्य गायब‎ आहे. ते रुग्णालयाच्या निवासस्थानी‎ राहत असूनही घरभाडे घेत आहेत.‎

त्याबाबतही वरिष्ठांकडून योग्य ती‎ चौकशी न करता त्यांना पाठीशी‎ घातले जात आहे. आपल्या‎ कार्यालयामार्फत करण्यात आलेला‎ ७४२६० रुपयांचा खर्च हा राष्ट्रीय‎ आरोग्य अभियानाच्या आर्थिक‎ मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात‎ आल्याचे दिसून येत नाही. एकंदरीत‎ यासर्व प्रकरणी चौकशी करण्याची‎ मागणी शिलवंत यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...